Sanjay Raut | संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी

| Updated on: Mar 23, 2026 | 9:07 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राऊत म्हणाले की, “2026 वर्ष संपण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पदावर नसतील, असे सर्वत्र बोलले जात आहे.” तसेच, अमित शाह यांच्या भवितव्याबाबतही अनिश्चितता असल्याचे त्यांनी सूचित केले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राऊत म्हणाले की, “2026 वर्ष संपण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पदावर नसतील, असे सर्वत्र बोलले जात आहे.” तसेच, अमित शाह यांच्या भवितव्याबाबतही अनिश्चितता असल्याचे त्यांनी सूचित केले. केंद्र सरकारवर आरोप करताना राऊत यांनी म्हटले की, “सध्याचे सत्ताधारी केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग यांचा गैरवापर करून सत्ता टिकवून ठेवत आहेत. या संस्थांना आपल्या ताब्यात ठेवून देशावर राज्य केले जात आहे.” यावेळी त्यांनी पुढे असेही नमूद केले की, “पापाचा अंत कधीतरी होतोच आणि त्याची फळे भोगावी लागतात. भारताला महाभारत म्हटले जाते, आणि या महाभारतात पाप फार काळ टिकणार नाही. लोकशाहीवर आघात करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल.” राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, यावर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Mar 23, 2026 09:07 PM
Follow Us