Nashik Politics : राऊतांच्या ट्विटचे पडसाद उमटले, बागूल आणि राजवाडेंच्या प्रवेशाला ब्रेक

Nashik Politics : राऊतांच्या ट्विटचे पडसाद उमटले, बागूल आणि राजवाडेंच्या प्रवेशाला ब्रेक

| Updated on: Jul 03, 2025 | 12:48 PM

Sanjay Raut Tweet : ठाकरे सेनेचे खासदार राऊत यांच्या ट्विटचे पडसाद आता नाशिकमध्ये उमटले आहेत.

चंदन पूजाधिकारी, प्रतिनिधी

राऊत यांच्या ट्विटनंतर बागूल आणि राजवाडेंच्या प्रवेशाला ब्रेक लागला आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेलं होतं. त्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांच्या प्रवेशाला ब्रेक लागलेला आहे. या दोघांवर नाशिकमध्ये गंभीर गुन्हा दाखल आहे आणि त्यानंतर संजय राऊत यांनी टीका केलेली होती. भाजपवर टीका होऊ लागल्याने या पक्ष प्रवेशाला आता ब्रेक लागला आहे.

आज नाशिकमध्ये तीन नगरसेवकांसह इतर पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार होते. त्याचा मोठ सोहळा देखील होणार होता. मात्र या पक्ष प्रवेश सोहळ्याबद्दल ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटचे पडसाद आता उमटले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या एक्स पोस्टनंतर सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या प्रवेशाला ब्रेक लागला. बागुल आणि राजवाडे यांच्यावर नाशकात गंभीर गुन्हा दाखल होता. भाजपावर टीका होऊ लागल्याने प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती समोर येत आहे.

Published on: Jul 03, 2025 12:48 PM