Saamana Interview : 19 जुलैला ‘राज’ उलगडणार? ठाकरेंचं मोठं वक्तव्य काय? राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर आऊट
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा टीझर जारी करण्यात आला आहे. बघा टीझरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून, या मुलाखतीचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. ‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. समानाद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या या मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. या मुलाखतीचा टिझर आज राऊत यांनी ट्विट केला. ज्यामध्ये उद्धव ठाकरे विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका व्यक्त करताना दिसतात.
संजय राऊतांनी घेतलेल्या ठाकरेंच्या मुलाखतीच्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केल्याचं पाहायला मिळाले, ज्यामध्ये ‘आता राज ठाकरेही बरोबर आले आहेत’, असं उद्धव ठाकरे म्हणताना दिसताय. यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीबद्दलच्या चर्चांना पुन्हा उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. तर दरम्यान, १९ आणि २० जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे मिळणार असंही या टीझरमधून सांगितलं जात आहे.
उद्धव ठाकरे यांची मुलाखत
सामना
19 आणि 20 July
सर्व प्रश्नांची रोख ठोक उत्तरे! pic.twitter.com/eYvXlW0Z6z— Sanjay Raut (@rautsanjay61) July 15, 2025
“ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही. तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो आहोत. माझ्या आजोबांपासून त्याच्यानंतर शिवसेनाप्रमुख, मग मी आहे, आदित्य आहे. आता सोबत राज आलेला आहे”, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
