रावसाहेब दानवे कधी कधी खरं बोलतात, शिंदे-भाजप सरकार पडणार : संजय राऊत

रावसाहेब दानवे कधी कधी खरं बोलतात, शिंदे-भाजप सरकार पडणार : संजय राऊत

| Updated on: Nov 22, 2022 | 11:41 AM

'जादू झाली आणि एका रात्रीमध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादच्या कन्नडमधील एका कार्यक्रमात केलं आहे.

दिल्ली : ‘जादू झाली आणि एका रात्रीमध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं’, असं वक्तव्य रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी औरंगाबादच्या कन्नडमधील एका कार्यक्रमात केलं आहे. राज्यात अशीच राजकीय परिस्थिती राहिली तर आणखी दोन महिन्यात काय होईल याचा कोणी अंदाज लावलाय का? असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकांचे भाकीत करण्यात आलं आहे. तर रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, शिंदे -भाजप सरकार पडणार, मला खात्री आहे. बदल होतील म्हणजेच सरकार पडणार हे रावसाहेब दानवे यांना म्हणायचं असेल असं संजय राऊत यांनी दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Nov 22, 2022 11:36 AM