Sanjay Shirsat: आदर व्यक्त करण्यासाठी शिरसाट यांनी ते ट्विट केले असावे- गुलाबराव पाटील

Sanjay Shirsat: आदर व्यक्त करण्यासाठी शिरसाट यांनी ‘ते’ ट्विट केले असावे- गुलाबराव पाटील

| Updated on: Aug 13, 2022 | 9:34 AM

संजय शिरसाट हे शिवसेनेच्या परतीच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा रंगू लागली आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट यांनी आदर व्यक्त करण्यासाठी ट्विट केले असावे त्यानंतर चूक लक्षात आल्यावर त्यांनी ते डिलीट केले

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरे यांचा जुना व्हिडीओ ट्विट (Sanjay Shirsat tweet)  केला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे (Udhhav Thackray) महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असा उल्लेख केला होता. त्यानंतर काही वेळाने त्यांनी हे ट्विट डिलीट केले. शिरसाट यांनी केलेल्या या ट्विटची चर्चा रंगू लागली आहे. तसेच त्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. संजय शिरसाट हे शिवसेनेच्या परतीच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा रंगू लागली आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट यांनी आदर व्यक्त करण्यासाठी ट्विट केले असावे त्यानंतर चूक लक्षात आल्यावर त्यांनी ते डिलीट केले, मात्र ते नाराज नाहीत असे पाटील म्हणाले. याशिवाय मी मंत्री पदाचा भुकेला नाही अशी प्रतिक्रिया संजय सिरसाट यांनी दिली आहे.

 

Published on: Aug 13, 2022 09:34 AM