Sanjay Shirsat : त्या येड्याच्या नादी लागून आम्ही आमचं.., शिरसाटांची राऊतांवर खरपूर टीका
Sanjay Shirsat Slams Sannjay Raut : संभाजीनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री यांनी आज संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत उबाठा बुडवत आहे. म्हणून काँग्रेस बाजूला आहे. शरद पवार यांना जाणीव होती म्हणून पवारांनी त्यांना मोहिमेवर ठेवले होते. संजय राऊत त्या वेड्याच्या मागे का लागू? आमचा रेट वाढला आहे, अशी खरपूस टीका मंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांच्यावर केली आहे. शिंदे नाराज नाहीत. काही वाद असेल तर ते मिटवले जातात, असंही शिरसाट यांनी सांगितलं.
पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ अजून हे ठरलेले नाही. याला अजून वेळ आहे. आजच्या घडीला सांगणे नाही. आता जर सांगितलं की कोण मोठा आणि कोण छोटा तर वाद होईल. कोण कुठल्या ठिकाणाहून लढत आहेत, त्यानंतर सर्व्हेला महत्व राहील. हा प्राथमिक सर्व्हे यानंतर अजून दोन सर्व्हे होईल. हा फक्त अंदाज आहे, हा सर्व्हे आहे,असेच घडेल असे मानून चालणे योग्य नाही. मुंबई महापालिकेवर आमचा भगवा फडकला पाहिजे,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
