Dehu Palkhi Sohola : वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं! देहूतून तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान

Dehu Palkhi Sohola : वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं! देहूतून तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान

| Updated on: Jun 18, 2025 | 4:32 PM

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला देहू येथून सुरुवात झाली, भाविक मोठ्या संख्येने जमले होते. उत्साहपूर्ण उत्सव आणि आध्यात्मिक उत्साहासह ही पालखी पंढरपूरला प्रयाण करेल.

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आज देहूतून दुपारी प्रस्थान होत आहे. यंदाचा हा ३४० वा पालखी सोहळा असून, या निमित्ताने देहू नगरीत पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण आहे. आपल्या लाडक्या विठू माऊलीच्या भेटीच्या ओढीने वारकऱ्यांच्या उत्साहाला यावेळी उधाण आलेलं बघायला मिळालं आहे.

मंदिरामध्ये आज पहाटे ४.३० वाजल्यापासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. शिळा मंदिरामध्ये अभिषेक झाल्यानंतर, स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक व काकड आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक आणि संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक व पूजा करण्यात आली. आज देहूतून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान झाले असताना, उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्यासाठी आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली असून, लाखोंच्या संख्येने वारकरी इंद्रायणीच्या तीरावर एकवटले आहेत.

Published on: Jun 18, 2025 04:24 PM