Phaltan Doctor Death : मी तिला फोन केला, घरी ये.. पण ती नको म्हणाली! तिथे मी गेलो अन् तो धष्टपुष्ट व्यक्ती… वडिलांच्या दाव्यानं खळबळ
फलटणमध्ये घडलेल्या घटनेतील महिला डॉक्टरच्या वडिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे. एका अनोळखी व्यक्तीने त्यांना मुलीबद्दल विचारले होते, ज्याला त्यांच्या मुलीने नंतर टाळण्यास सांगितले. आता, मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांनी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असून, मुख्यमंत्र्यांकडे न्यायासाठी कळकळीची विनंती केली आहे.
बीड येथील एका महिला डॉक्टरच्या फलटणमधील संशयास्पद मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. मुलीला भेटायला गेले असताना वडिलांना एका अनोळखी धष्टपुष्ट व्यक्तीने गाठले होते. त्या व्यक्तीने “तुम्ही मॅडमचे वडील का?” असे विचारून “काही लागलं तर मला सांगा” असे म्हटले होते. त्यावेळी मुलीने वडिलांना हाताला धरून बाजूला घेतले आणि “कुणालाही असं बोलत जाऊ नका. ही लोकं माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत” असे सांगितले होते.
या घटनेमुळे वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आता वडिलांनी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कळकळीची विनंती केली आहे की, त्यांच्या मुलीवर झालेल्या अन्यायाची पुनरावृत्ती इतर कोणत्याही मुलीसोबत होऊ नये. अशी भावनिक मागणी केली आहे.
Published on: Oct 25, 2025 11:45 PM
