VIDEO : मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी Satej Patil यांची ‘मिसळ पे चर्चा’
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालीय. प्रचाराला सुरुवात झाल्यानं नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. मतदारांच्या गाठीभेठी घेणं, आश्वासनांचा पाऊस पाडणं इतकंच काय तर मिसळ पे चर्चा हा उपक्रम शिवसेना आमदार सतेज पाटील यांनी सुरु केला आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांकडूनही चाय पे चर्चा सुरु आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालीय. प्रचाराला सुरुवात झाल्यानं नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. मतदारांच्या गाठीभेठी घेणं, आश्वासनांचा पाऊस पाडणं इतकंच काय तर मिसळ पे चर्चा हा उपक्रम शिवसेना आमदार सतेज पाटील यांनी सुरु केला आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांकडूनही चाय पे चर्चा सुरु आहे. आता या दोन्ही नेत्यांनी केलेल्या प्रचाराच्या नव्या फंड्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. काँग्रेसचे नेते दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर जागेची पोटनिवडणूक होत आहे. यामुळे या पोटनिवडणुकीकडे राज्यभराचं लक्ष आहे.
