“मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा…” संभाजी ब्रिगेडचा इशारा

| Updated on: May 29, 2023 | 11:51 AM

महाराष्ट्र सदनामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे मूळ जागेवरून दुसरीकडे हलवण्यात आले होते. यावरून आता संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र सदनामध्ये राजमाता अहिल्याराणी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचा अवमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राची माफी मागावी.

Follow us on

मुंबई : महाराष्ट्र सदनामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे मूळ जागेवरून दुसरीकडे हलवण्यात आले होते. यावरून आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र सदनामध्ये राजमाता अहिल्याराणी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचा अवमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राची माफी मागावी.अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने 31 मे रोजी राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या जयंती दिनी महाराष्ट्रभर सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. खोट्या सावरकर प्रेमापोटी आणि मताच्या राजकारणासाठी महान महिला महानाईकांचा अवमान हा महाराष्ट्र सरकार आणि सरकार मधील सर्वोच्च पदावर बसणारी माणसं करत असतील, तर हे महाराष्ट्रद्रोही, महापुरुषांच्या विचारांच्या विरोधी सरकार आहे. अशा जातीवादी विचारांना महाराष्ट्र कदापिही माफ करणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राची माफी मागितलीच पाहिजे, असं संतोष शिंदे म्हणाले.