Osmanabad | उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरु, विद्यार्थी उत्साहात

| Updated on: Jul 15, 2021 | 2:46 PM

उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थीचा आनंद गगनात मावेना झाला आहे , कोरोना मुक्त गावात शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे .

Follow us on

उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थीचा आनंद गगनात मावेना झाला आहे , कोरोना मुक्त गावात शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे . उस्मानाबाद जिल्ह्यातील खानापूर येथील केशव विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. गेल्या 1 महिन्यात कोरोना रुग्ण ज्या गावात सापडलं नाहीं त्या गावात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एका बाकड्यावर एका विद्यार्थीला बसविण्यात आले तर शाळेत आल्यावर सॅनिटायझर सह ऑक्सिजन पातळी ताप याची आरोग्य तपासणी करण्यात आली. अनेक दिवसानंतर शाळा सुरू झाल्याने शिक्षक मित्र मैत्रिणी यांना भेटण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत  ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या तरी शहरी भागातील शाळा ह्या कुलूपबंद आहेत त्यामुळे शहरी भागातील मुलांचा हिरमोड झाला आहे.