Radhakrishna Vikhe Patil | अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय ठरलं? विखे पाटील म्हणतात..

| Updated on: Aug 11, 2021 | 8:18 PM

घटनदुरुस्तीची मागणी मुळात विरोधकांनी केली होती, सभागृहात एक बोलायचं सभागृहाबाहेर वेगळं बोलायचं. महाविकास आघाडीच्या लोकांना आरक्षण द्यायचंच नाहीय, फक्त लोकांमध्ये संशय आणि विसंवाद निर्माण करायचा आहे, असे विखे पाटील म्हणाले.

Follow us on

YouTube video player

पुणे : राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतली. भेटीबाबत विखे पाटील यांनी मीडिया बातचीत केली. अमित शहा आमच्या पक्षाचे नेते आहेत सहकारमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि सहकार विभागासंदर्भात निवेदन देण्यासाठी अमित शहांची भेट घेतली. अमित शहा चंद्रकांत पाटलांना भेटले की नाही भेटलेत मला त्याची कल्पना नाही. सहकारी संस्थांचे बळकटीकरण कसं होईल यावर त्यांच्याशी चर्चा झाली. घटनदुरुस्तीची मागणी मुळात विरोधकांनी केली होती, सभागृहात एक बोलायचं सभागृहाबाहेर वेगळं बोलायचं. महाविकास आघाडीच्या लोकांना आरक्षण द्यायचंच नाहीय, फक्त लोकांमध्ये संशय आणि विसंवाद निर्माण करायचा आहे, असे विखे पाटील म्हणाले.