Special Report | Param Bir Singh यांचे 3 मंत्र्यांवर खळबळजनक आरोप!

Special Report | Param Bir Singh यांचे 3 मंत्र्यांवर खळबळजनक आरोप!

| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 10:08 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मला सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याच्या सूचना केल्याचा दावा परमबीर सिंह यांनी ईडीकडे केलाय.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बळावत चालली आहे. कारण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनेक सनसनाटी खुलासे केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मला सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याच्या सूचना केल्याचा दावा परमबीर सिंह यांनी ईडीकडे केलाय. त्याचबरोबर सचिन वाझेला सेनेत घेतल्यानंतर गुन्हे शाखेत महत्वाच्या पदावर नियुक्ती द्या असंही आपल्याला सांगण्यात आलं होतं, असं परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलंय.