Separate Vidarbha : वेगळ्या विदर्भासाठी काम सुरू, बावनकुळे यांचं मोठं विधान, नागपूर अधिवेशनात पुन्हा विदर्भाचा मुद्दा चर्चेत

| Updated on: Dec 09, 2025 | 10:45 AM

नागपूर अधिवेशनात काँग्रेसने वेगळ्या विदर्भाची मागणी केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजपने या मागणीला आपलाच अजेंडा म्हटले असून त्यावर काम सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीसही या बाजूने आहेत. मात्र, आदित्य ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भाला विरोध दर्शवला आहे, तर राष्ट्रवादीचीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका आहे.

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात वेगळ्या विदर्भाच्या मागणीने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात लक्ष वेधले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली, तर भाजपने तात्काळ या मागणीला आपलाच अजेंडा असल्याचे सांगितले. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, वेगळ्या विदर्भावर काम सुरू आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या मागणीच्या बाजूने आहेत. बावनकुळे यांच्या मते, विदर्भाला पुरेसा निधी मिळत नाही आणि मागासलेपण कायम आहे, त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे येत आहे. काँग्रेसने आता अधिवेशन संपल्यावर या मागणीसाठी हाय कमांडशी चर्चा करून मोहीम सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी या मागणीला विरोध करत विदर्भ महाराष्ट्राचे अविभाज्य अंग असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील ऐतिहासिकदृष्ट्या वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका घेतली आहे.

Published on: Dec 09, 2025 10:45 AM