Shahajibapu Patil Raksha Bandhan | शहाजीबापू पाटील मंत्री होणार – बहिणीची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 11, 2022 | 12:03 PM

बहिण आणि भाऊ यांचे अतूट नातं, प्रेमाचं नातं व्यक्त करण्याचा आजचा राखी पौर्णिमेचा हा दिवस. बहिणीने भावाला राखी बांधायची आणि त्या बदल्यात भावाने बहिणीचे आयुष्यभर रक्षण करायचे.

Follow us on

बहिण आणि भाऊ यांचे अतूट नातं, प्रेमाचं नातं व्यक्त करण्याचा आजचा राखी पौर्णिमेचा हा दिवस. बहिणीने भावाला राखी बांधायची आणि त्या बदल्यात भावाने बहिणीचे आयुष्यभर रक्षण करायचे. माझ्या तीन बहिणींनी मला प्रचंड प्रेम माया दिली. माझ्या राजकीय चळवळी त्यांनी पूर्णपणे मला साथ दिली. माझ्या बहिणीने सुद्धा अनेक त्यागाच्या गोष्टी माझ्यासाठी केल्यात. त्यांच्या भावाच्या हातून गोरगरिबांची सेवा व्हावी अशी त्यांची इच्छा होती. आणि ती आता होताना पाहायला मिळते. त्यामुळे मी त्यांना वंदन करतो. माझ्या सख्या तीन बहिणी असल्या तरी या तालुक्यात लाखो बहिणी आहेत. या तालुक्यात माझ्या लाखो बहिणी आहेत त्यांनी माझ्यावर प्रेम माया केली. माझ्या सुखदुःखात सोबत राहिल्या म्हणून मला लढण्याचं बळ मिळालं. आमचा भाऊ हा गोरगरीब इथून पुढे आला. भरपूर संघर्ष केला. शहाजी बापूंचा लहानपणापासून असाच हवा आहे सुख आणि दुःख त्यांना एकच आहे. नेहमी आनंदी राहणार. मोठा झाला म्हणून गर्व नाही. आम्ही लहानपणापासून बहीण भाऊ एकत्रच राहिलो.