Sharad Pawar : पवारांची राष्ट्रवादी ‘हा’ एकच मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार? मोठी बातमी काय?

Sharad Pawar : पवारांची राष्ट्रवादी ‘हा’ एकच मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार? मोठी बातमी काय?

| Updated on: Jun 13, 2025 | 7:55 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता राष्ट्रवादी शरद पवार गटाची कोणत्याही पक्षासोबत युती होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गट कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास तयार असल्याची बातमी सूत्रांकडूम मिळत आहे. तर स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय स्थानिक नेतेच घेतील असेही सूत्रांकडून सांगितले जात आहे. तर युतीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय देखील राष्ट्रावादी शरदचंद्र पवार पक्षासाठी खुला राहणार असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अजित दादांच्या राष्ट्रवादीसोबत शरद पवार यांचा पक्ष युती करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या युती म्हणून लढवल्या जाणार की? स्वबळावर लढणार यासंदर्भात देखील उत्सुकता निर्माण झालेली असताना शरद पवार यांच्या गटासंदर्भात ही मोठी माहिती समोर आली आहे.

Published on: Jun 13, 2025 07:55 PM