काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी,काय म्हणाले प्रशांत जगताप ?
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांसोबत चालल्याने नाराज होऊन शरद पवार यांना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या प्रशांत जगताप यांनी आपण आता काँग्रेस सोबतच राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
काँग्रेसमध्ये येताना आपण भावनिक होतो, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी साडे सव्वीस वर्षे होतो. तिथे काही कमर्शियल नात नव्हते. पवार साहेबांवर श्रद्धा होती. नातं तर आणि श्रद्धा आजपण आहे असे शरद पवार यांना सोडचिट्टी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. या कार्यालयातील सर्व बदलले असले तरी काही नाती हृदयात असतात तसे शरद पवार कायम श्रद्धास्थानी राहतील. परंतू आता काँग्रेस सोबत आलो आहोत. काँग्रेस काही दिले नाही दिले तरी आता येथेच राहणार आहोत. कारण एक विचार म्हणून येथे आलो आहोत. नाही तर अन्य पक्षांच्या देखील ऑफर होत्या असेही जगताप यांनी म्हटले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी बरोबर येण्याची चर्चा होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस माझ्या काँग्रेस सोबत महाविकास आघाडीत येणार असेल तर आनंदच आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
