राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार आक्रमक, म्हणाले राज्यपालांना कुठे…

| Updated on: Nov 21, 2022 | 1:16 PM

राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आक्रमक

Follow us on

बुलढाणा : राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) देखील आक्रमक झाले आहेत. राज्यपालांना कुठे पाठवायचं तिकडे पाठवा, राज्यपालांच्या वक्तव्यामुळे सरकारमध्ये वाद निर्माण होईल. ज्या राज्यपालांना आपल्या राज्याचा इतिहास माहिती नाही, ज्यांना राज्य काय आहे ते कळतं नाही अशा राज्यपालांना आपल्या राज्याच्या राज्यपाल पदावर ठेऊ नये. त्या ऐवजी मराठी मातीतील माणूस राज्यपाल पदी ठेवा. अशी मागणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी राज्यपालांच्या पोस्टरला जोडो मारून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबात केलेल्या विधानाचा निषेध केला जात आहे. राजकीय स्तरातून देखील राज्यपालांवर टीका केली जात आहे.