tv9 Marathi Special Report | महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत

tv9 Marathi Special Report | महापौरपदाची निवड लांबणार, मोठं कारण आलं समोर; इच्छुक चिंतेत

| Updated on: Jan 19, 2026 | 11:34 AM

मुंबईमध्ये महायुतीचे सध्या 118 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 114 नगरसेवकांची गरज असते. बहुमतापेक्षा फक्त 4 नगरसेवक महायुतीकडे जास्त आहे त्यामुळे नागरसेवकांना एकजूट ठेवणं हे शिंदेंसाठी खूप महत्वाचं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आणि दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 29 विजयी नागरसेवकांना मुंबईच्या हॉटेलमध्ये ठेवलंय, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. शिंदेंना नगरसेवक फुटीची भीती वाटतेय कि भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिंदेंनी ही खेळी खेळले, यावर आता तर्क वितर्क लढवले जात आहेत. मुंबईमध्ये महायुतीचे सध्या 118 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 114 नगरसेवकांची गरज असते. बहुमतापेक्षा फक्त 4 नगरसेवक महायुतीकडे जास्त आहे त्यामुळे नागरसेवकांना एकजूट ठेवणं हे शिंदेंसाठी खूप महत्वाचं आहे. शिंदेंच्या निवडून आलेल्या नागरसेवकांपैकी अनेकजण यापूर्वी ठाकरेंसोबत होते त्यामुळे ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून शिंदेंनी दक्षता बाळगली आहे. त्यामुळे महापौरपदाची निवड होईपर्यंत हे नगरसेवक वांद्रयातल्या हॉटेल ताज लँड्स एन्ड मधेच मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या महापौर पदाची सोडत अद्याप काढली गेली नाही त्यामुळे महापौर पदाच्या निवडीसाठी आणखी काही वेळ जाणार आहे, तोपर्यंत नगरसेवकांना एकजूट ठेवावं लागणार.

Published on: Jan 19, 2026 11:34 AM