Saibaba DNA : …त्यांनी आधी साईबाबांचा DNA दाखवा, आधी वादग्रस्त वक्तव्य, आता म्हणताय माझ्या तोंडून…
साईबाबांच्या हातातलीच ही नाणी आहेत हे भारत सरकार आणि पुरातत्व खात्याने ठरवावं. डीएनए चाचणी कशी करावी हे देखील त्यांनी ठरवावं. अरुण गायकवाड यांनी केलेले वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर शिर्डीमध्ये त्यांच्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
साईबाबांचे भक्त असेलल्या लक्ष्मीबाई शिंदे यांना साईबाबांनी शेवटच्या काळात चांदीची नऊ नाणी दिली होती. साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली नऊ चांदीची नाणी नेमकी कोणाकडे आहेत? यावरून चांगलाच वाद रंगतोय. अशातच हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. अशातच साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी एक वादग्रस्त वक्त्याव्य केलं त्यामुळे शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झालेत.’आपल्याकडे असलेली नाणीच खरे असणारा दावा करणाऱ्यांनी साईबाबांचा डीएनए आम्हाला दाखवावा’, असं वादग्रस्त वक्तव्य अरुण गायकवाड यांनी केलं. या वक्तव्यावरून त्यांना शिर्डी ग्रामस्थांचा रोष ओढावून घ्यावा लागतोय. इतकंच नाहीतर ग्रामस्थांनी याचा निषेध करत आंदोलनही केलंय. दरम्यान, यानंतर अरुण गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. साईबाबांसंबंधी ते वक्तव्य अनावधानाने निघालं त्या नाण्याचे डीएनएचे पुरावे द्या, असा बोलण्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितलं.
