बारामतीच्या काकांचं हे वाक्य… सुनेत्रा पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून शितल म्हात्रेंची शरद पवारांवर टीका

बारामतीच्या काकांचं हे वाक्य… सुनेत्रा पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून शितल म्हात्रेंची शरद पवारांवर टीका

| Updated on: Apr 12, 2024 | 3:23 PM

सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या शरद पवार यांच्या वक्तव्यावरून शितल म्हात्रे यांनी ट्वीट करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 'सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा आहे आमच्या महाराष्ट्रात... कदाचित मुलीच्या प्रेमापोटी, तुम्ही राजकारणासाठी तुमचे विचार बदलले... बारामतीच्या काकांचं हे वाक्य...

अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या शरद पवार यांच्या वक्तव्यावरून शितल म्हात्रे यांनी ट्वीट करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ‘सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा आहे आमच्या महाराष्ट्रात… कदाचित मुलीच्या प्रेमापोटी, तुम्ही राजकारणासाठी तुमचे विचार बदलले… बारामतीच्या काकांचं हे वाक्य, ‘महाराष्ट्रातल्या समस्त लग्न करुन सासरी गेलेल्या सुनांचा अपमान’ आहे… सो कॉल्ड फुरोगामी…!!!’, असं ट्वीटमध्ये शितल म्हात्रे यांनी म्हटलं असून शरद पवारांवर सडकून टीका केली आहे. शितल म्हात्रे यांनी आपल्या ट्वीटमध्ये असेही म्हटले की, ”बाहेरुन’ आलेल्या सावित्री माई ज्योतिबांसोबत समाजकारणात उभ्या राहिल्या…’बाहेरुन’ आलेल्या येसूबाई, ताराराणी यांच्यासारख्या सुना स्वराज्यासाठी झगडल्या… अहो रमाईच्या संसारातल्या त्यागाने तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे पुरुष घडत असतात…’. सुनेत्रा पवार या मूळ पवार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. इतकंच नाहीतर सुनेत्रा पवार मूळ पवार नसून त्या बाहेरच्या असल्याचे म्हटलंय. मूळ पवारांमध्ये फरक असंच विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यावर शितल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Published on: Apr 12, 2024 03:23 PM