शिवसैनिकांनी अब्दुल सत्तारांचा ताफा रोखला; अचानक झालेल्या आंदोलनाने पोलिसांची तारांबळ

| Updated on: Sep 24, 2022 | 2:59 PM

कृषी मंत्र्यांनी आमच्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं, अनुदान यादीत परभणीचा पुन्हा एकदा समावेश करावा, आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे काही काळ वातावरण तंग झालं होतं.

Follow us on

नसीम खान, परभणी: कृषीमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) हे परभणी दौऱ्यावर आहेत. त्यांचे आज परभणीत विविध कार्यक्रम होते. पूर्णा येथे एका कार्यक्रमासाठी जात असता शिवसेनेचे (shivsena) जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी सत्तार यांचा ताफा अडवला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अब्दुल सत्तार हाय हायच्या घोषणाही दिल्या. शिवसेनेने केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ शिवसैनिकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्तार यांनी गाडीतून खाली उतरून शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर त्यांच्या मागण्यांचं निवेदनही स्वीकारलं. कृषी मंत्र्यांनी आमच्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं, अनुदान यादीत परभणीचा (parbhani) पुन्हा एकदा समावेश करावा, आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे यावेळी काही काळ वातावरण तंग झालं होतं.