Amravati Shivsena Protest | पीक विमा न मिळाल्याने शिवसेना नेत्याने अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली

Amravati Shivsena Protest | पीक विमा न मिळाल्याने शिवसेना नेत्याने अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली

| Updated on: Jun 08, 2022 | 6:49 PM

मागील वर्षी कृषी विभागाने जबरस्तीने शेतकऱ्यांना विमा काढायला लावला होता. मात्र यावर्षी पेरणीचा हंगाम तोंडावर येऊन देखिल असूनही मागील वर्षीचा पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

अमरावती : गेल्या वर्षी अमरावती (Amravati) जिल्ह्यात काढलेला पीक विमा (Crop Insurance) न मिळालेले पैसे आणि त्यानंतर कोसळेले आस्मानी संकंटामुळे अमरावतीचा शेतकरी हा संकंटात अडलेला आहे. त्यातच हा वर्षीचा पेरणीचा हंगाम सुरू होत असल्याने पेरणीसाठी पैसा आणायचा कोठून असा सवाल त्यांना सतावत आहे. याविचारांच्या गर्तेतून बाहेर पडत शेतकऱ्यांनी थेट जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात धाव घेतली. तसेच विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीला जाब विचारला. यावेळी हैराण झालेल्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनाही (Shiv Sena)जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय गाठले होते. तसेच पीक विमा कधी मिळणार यावर विचारणा केली असता, योग्य उत्तर मिळाले नाही. यातूनच शिवसेनेच्या तालुका अध्यक्षने विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीच्या कानशिलात लगावल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते.

Published on: Jun 08, 2022 06:49 PM