‘ते’ वक्तव्य संजय राऊत यांना भोवलं! हक्कभंग नोटिसला काय दिलं उत्तर, बघा व्हिडीओ
VIDEO | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून अखेर त्यांच्याविरोधातील हक्कभंग नोटिशीला उत्तर, काय म्हणाले बघा...
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत केलेल्या वक्तव्यावरून विधानसभा अध्यक्षांकडून संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटिस पाठवण्यात आली होती. अखेर संजय राऊत यांनी त्यांच्याविरोधातील हक्कभंग नोटिशीला उत्तर दिलं आहे. हक्कभंग नोटिशीची मुदत संपल्यानंतरही संजय राऊत यांनी कोणतेही उत्तर दिले नव्हते म्हणून संजय राऊत नेमकं काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. तर आपण केलेल्या वक्तव्याबाबत सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच विधिमंडळाबाबत आपण कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही, असेही यांनी ठामपणे सांगितले आहे. विधानसभा अध्यक्षांकडून आलेल्या नोटिशीला सकाळपर्यंत स्पष्ट उत्तर दिलं नव्हतं मात्र, त्या नोटिशीचं उत्तर देणारं पाठवलेलं पत्र समोर आलंय.
