Anil Parab : आणखी एक मंत्री अडचणीत? अनिल परबांचा योगेश कदमांवर गंभीर आरोप, पुराव्याचा दावा करत म्हणाले…

Anil Parab : आणखी एक मंत्री अडचणीत? अनिल परबांचा योगेश कदमांवर गंभीर आरोप, पुराव्याचा दावा करत म्हणाले…

| Updated on: Jul 02, 2025 | 8:09 AM

महसूल राज्यमंत्री योगेश कदम वाळू चोरी करत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला आहे. तर पुरावे असल्यास त्यावेळी असे म्हणत आरोप सिद्ध झाल्यास राजीनाम्याची तयारी योगेश कदम यांनी बोलून दाखवली आहे.

ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर नाव न घेता आरोप केला आहे. अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर वाळू चोरीचा आरोप केला आहे. पुरावा असल्याचे म्हणत अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यानंतर महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर कारवाई करणार का? असा सवालच अनिल परब यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना केलाय. इतकंच नाहीतर वाळू पकडल्याची ५ प्रकरणं देतो म्हणत अनिल परब यांनी थेट आव्हानच दिलं आहे. तर अनिल परब यांचा मुद्दा महत्त्वाचा असून त्यांनी माहिती द्यावी, अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन करेन असं महसूल मंत्री बावनकुळे म्हणालेत. यावर पुरावे असतील तर त्यांनी अध्यक्षांकडे द्यावे, आरोप सिद्ध झाला तर राजीनामा देईल, असं स्पष्टच योगेश कदम यांनी म्हटलंय.

Published on: Jul 02, 2025 08:09 AM