Sanjay Raut : … म्हणून ‘ते’ ट्वीट फडणवीसांसह मोदी अन् शहांना टॅग केलं; म्हणाले टायगर अभी जगह जगह पे…

Sanjay Raut : … म्हणून ‘ते’ ट्वीट फडणवीसांसह मोदी अन् शहांना टॅग केलं; म्हणाले टायगर अभी जगह जगह पे…

| Updated on: Jul 01, 2025 | 1:22 PM

संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी केलेल्या एका ट्वीटबद्दल थेट भाष्य केले. हा विजय या महाराष्ट्र दृष्टांवरचा विजय प्राप्त आहे त्यामुळे आम्ही मोदी, शहा आणि फडणवीसांना जय महाराष्ट्र केला, असे संजय राऊतांनी म्हटले.

हिंदी सक्तीविरोधातील शासन निर्णय सरकारने रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंचा ५ जुलैला विजयी मेळावा होणार आहे. या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं एक ट्वीट चर्चेत आलं आहे. जय महाराष्ट्र शुभ प्रभात.. असं राऊतांनी ट्वीटमध्ये म्हटलंय. इतकंच नाहीतर राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅग करत गुड मॉर्निंग म्हटलंय. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. या ट्वीटनंतर राऊतांनी पत्रकार परिषदेत या ट्वीटचा अर्थ सांगितला आहे.

यावेळी त्यांनी हसत हसत पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर दिलं. ते म्हणाले सकाळी सकाळी आपण आपल्या प्रिय व्यक्तींना गुड मॉर्निंग करतो. शिवसेना आणि शिवसेनेचे वाघ अजून जिवंत आहेत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, अमित शाह गृहमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या तिघांनी मिळून शिवसेना तोडली. ५ जुलैला मराठी विजय दिवसाचे आम्ही त्यांनाही आमंत्रण देणार आहेत. तेव्हा त्यांनीही पाहावं की हा विजयी सोहळा नेमका काय आहे. मराठी भाषेसंदर्भात किंवा हिंदी सक्तीसंदर्भात मराठी एकजुटीने जो विजय प्राप्त केला, हा विजय या महाराष्ट्र दृष्टांवरचा विजय प्राप्त आहे त्यामुळे आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केल्याचे संजय राऊत म्हणाले.

Published on: Jul 01, 2025 01:22 PM