KEM Hospital Protest Video : केईएम रुग्णालयाकडून ‘माय मराठी’चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं
केईएम रुग्णालयाच्या बोर्डवर मराठीत मजकूर नसल्याने शिवडी परळ येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावण्यात आलेल्या गेटला काळ फासलं... रुग्णालय प्रशासनाला वारंवार सांगून देखील दुर्लक्ष केल्याने ठाकरे गटाने घेतली भूमिका
केईएम रुग्णायाच्या गेटला शिवसैनिकांनी काळ फासून आज आंदोलन केलं. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम हॉस्पिटलच्या शतकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने सर्व प्रवेशद्वारांवर नवीन गेट तयार करण्यात आले. त्यावर केईएम प्रशासनाने इंग्रजीमध्ये लिहून मराठीचा अपमान केला, असे ठाकरे गटाचे म्हणणं आहे. दरम्यान, मराठीत मजकूर नसल्याने शिवडी परळ येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गेटला काळ फासलं. रुग्णालय प्रशासनाला वारंवार सांगून देखील दुर्लक्ष केल्याने ठाकरे गटांकडून आज आक्रमक भूमिका घेण्यात आली. केईएम रुग्णालयाला १०० वर्ष पूर्ण झाल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे कार्यक्रम १८ ते २२ जानेवारीदरम्यान होते. तर परदेशातील पाहुणे येणार आहेत, असे सांगून इंग्रजीमध्ये करण्याचा हट्ट केइम प्रशासनाचा होता, परंतु कार्यक्रम संपूनही दोन महिने झाले तरी केइम प्रशासनाने हे इंग्रजी बोर्ड काढले नाहीत. यासंदर्भात ठाकरे गटाने केइम रुग्णालयाच्या प्रशासनाला निवेदन दिले होते. यामध्ये तातडीने इंग्रजी गेट काढा किंवा मराठी करा, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्याला एक महिना होऊन गेला तरी अद्याप कार्यवाही केलेली नाही. म्हणून शिवसेनेच्या वतीने आज आंदोलन करून या इंग्रजी गेटला काळे फासण्यात आले आहे.
