Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत फोर्टिस रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय? आवाजात थकवा अन्…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घशाचा त्रास हे त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमुख कारण सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांची नियमित आरोग्य तपासणी झाली होती, तसेच त्यांना यापूर्वी दोन वेळा अँजिओप्लास्टी झाली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय राऊत यांना घशाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले होते. त्यावेळी त्यांच्या आवाजात थकवा जाणवत होता. यापूर्वी त्यांची नियमित आरोग्य तपासणी दोन दिवसांपूर्वी याच फोर्टिस रुग्णालयात झाली होती, त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौराही केला होता.
संजय राऊत यांना याआधी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दोन वेळा अँजिओप्लास्टी झाली आहे, त्यामुळे त्यांना नियमित आरोग्य तपासणी करावी लागते. सध्या त्यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, त्यांना उपचारांसाठीच दाखल करण्यात आले असल्याची चर्चा आहे.
