Sanjay Raut :  …तेव्हा त्यांचा जन्मही झाला नव्हता, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला काय?

Sanjay Raut : …तेव्हा त्यांचा जन्मही झाला नव्हता, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला काय?

| Updated on: Jul 05, 2025 | 10:35 AM

आम्ही शिवसैनिकांनी मराठीचा अपमान कधीच होऊ दिला नाही. त्यावेळी आम्ही तुरूंगवास भोगला, गुन्हे दाखल झालेत. त्यात तुम्हीही असंच केलं तुम्ही काय वेगळं नाही केलं? असा सवाल करत या विषयावर फडणवीसांनी कमीत कमी भाष्य केलं तर त्याचा मान राखेल असं राऊत म्हणाले.

आम्ही भाषेसाठी आम्ही आग्रही आहोत पण मराठी भाषेच्या नावाखाली गुंडगिरी केली जात आहे. ती खपवून घेतली जाणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला नव्हता तेव्हा शिवसेनेचा जन्म झालाय. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या संघर्षातून उभी केली त्या संघर्षाचा अभ्यास देवेंद्र फडणवीस यांनी करायला हवा. कारण ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत.’, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. पुढे राऊत असेही म्हणाले, आज फडणवीस जे ताठ मानेने बोलताय त्यामागे आमची गुंडगिरी कारणीभूत आहेत. आम्ही जे मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रात मराठी माणसाला सन्मानाने जगता यावं म्हणून केलेली विधायक गुंडागिरीमुळे तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसला आहात, असं म्हणत राऊतांनी टीकास्त्र डागलं

Published on: Jul 05, 2025 10:29 AM