Sanjay Raut : …त्यांना तहान लागलीये, पण गटाराचं पाणी… राऊतांना म्हणायचंय काय? पवारांच्या नव्या पिढीकडे रोख?

Sanjay Raut : …त्यांना तहान लागलीये, पण गटाराचं पाणी… राऊतांना म्हणायचंय काय? पवारांच्या नव्या पिढीकडे रोख?

| Updated on: May 29, 2025 | 12:12 PM

संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद सुरू असताना राऊतांनी अनेक विषयांवर भाष्य केले. तर पवारांच्या पक्षातील नव्या पिढीला उद्देशून चिमटाही काढला. बघा काय म्हणाले संजय राऊत?

भाजपसोबत जाण्याची काहीना तहान लागली आहे. पण तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही, अशा शब्दांत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या पिढीला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खणखणीत टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे याचं किंवा अन्य काही नेत्यांची नाव तुम्ही वारंवार घेत आहात. त्यांना तहान नक्कीच लागली असेल. पण तहान लागल्यावर कोणी गटारातील गढूळ पाणी पीत नाही. तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात जरी उडी मारायचं म्हटलं तर त्या साागरात इतक्या लाटा उसळल्या आहेत, इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये, की प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. जे गेलेले आहेत, तेच धडपडतायच तिथे अस्तित्वासाठी… नवी जाऊन काय करणार? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी यावेळी केलाय.

Published on: May 29, 2025 12:12 PM