Vasant More : गोगावलेंची निवडणुकीपूर्वी गुवाहाटीच्या मांत्रिकाकडून आघोरी पूजा… ठाकरेंच्या नेत्याचा खळबळजनक आरोप, बघा VIDEO

Vasant More : गोगावलेंची निवडणुकीपूर्वी गुवाहाटीच्या मांत्रिकाकडून आघोरी पूजा… ठाकरेंच्या नेत्याचा खळबळजनक आरोप, बघा VIDEO

| Updated on: Jun 16, 2025 | 4:31 PM

शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरतशेठ गोगावले यांनी मोठा खळबळजनक दावा करत शिवसेना पक्षाच्या फुटीमागे वहिनींचा हात असल्याचं म्हणत मोठा बॉम्बच गोगावलेंनी टाकलाय. यानंतर ठाकरे गटाकडून पलटवार करण्यात आलाय

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर ठाकरेंची सेना भरत गोगावले यांच्यावर आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात होता असं अप्रत्यक्षपणे भरत गोगावले यांनी म्हटलं आणि ते टीकेचे धनी बनले. दरम्यान, आता भरत गोगावले यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेतील वसंत मोरे यांनी हल्लाबोल केलाय. ‘भरत गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केली’, असं वसंत मोरे यांनी म्हणत गंभीर आरोप केलेत. गुवाहाटीच्या बगलामुखी येथून महाराज आणून गोगावले यांनी निवडणुकीच्या पूर्वी अघोरी पूजा केल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले. भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर ठाकरे गटाकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय. या अघोरी पूजेचा एक व्हिडिओ समोर आणत वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर घणाघात केलाय. बघा व्हिडीओ

Published on: Jun 16, 2025 04:31 PM