पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं गॅस दरवाढीविरोधात आंदोलन, रस्त्यावरच पेटवली चूल अन् थापल्या भाकऱ्या
उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमत ५० रूपयांनी वाढली आहे. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणारं सिलेंडर आता ५०० रूपयांऐवजी ५५० रूपयांना मिळणार आहे. तर दुसरीकडे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीदेखील ५० रूपयांनी वाढल्या असल्याने आता एलपीजी सिलेंडर ८०३ रूपयांऐवजी आता ८५३ रूपयांना मिळणार आहे.
केंद्र सरकारने नुकतीच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्याची मोठी घोषणा केली. सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली असून याआधी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कातही वाढ केली होती. मंगळवार, ८ एप्रिलपासून एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याच गॅर दरवाढीविरोधात पुण्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी गॅस दरवाढ विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे चूल पेटवा आंदोलन करण्यात आलं असून ठाकरेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी रस्त्यावरच चूल पेटवून त्यावर पोळ्या भाकऱ्या केल्यात तर काहींनी डोक्यावर सिलेंडरच उचलले आणि गॅस दरवाढीचा निषेध केला. वाढत्या महागाईच्या विरोधात पुणे शिवसेना आक्रमक झाली असून रस्त्यावरती चूल पेटवत सरकारचा निषेध करण्यात आला.
Published on: Apr 10, 2025 01:50 PM
