बुलढाण्यात रंगाची उधळण करत शिव-पार्वतीचा अनोखा विवाह सोहळा संपन्न

| Updated on: Mar 30, 2023 | 5:13 PM

VIDEO | बुलढाण्यात चैत्र शुद्ध अष्टमीच्या निमित्ताने शिव-पार्वती विवाह भाविकांनी मोठ्या उत्साहात केला साजरा

Follow us on

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जवळील सुटाळा बुद्रुक येथे चैत्र शुद्ध अष्टमीच्या निमित्ताने शिव-पार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला, यानिमित्त मुख्य मंदिरात रुखवताचा कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे महादेव संस्थानच्या वतीने २९ मार्च रोजी शिवपार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, रात्री ८ वाजता महापूजा करुन विधिवत पद्धतीने शिव-पार्वती विवाह सोहळ्यास सुरुवात झाली, गुलाबी रंगाची उधळण करत, ज्वारीच्या अक्षता टाकत, मंगल अष्टकांच्या साथीने भक्तिमय वातावरणात शिव-पार्वती विवाह संपन्न झाला, याप्रसंगी शाही ढोल नगारे यांचा निनाद करण्यात आला. हर हर महादेव या भाविकांच्या गर्जनेने अवघा महादेव मंदिर परीसर दुमदुमला होता. लग्न विधिवत पध्दतीने पार पडल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत सर्व मानकरी बोहल्यावर रंग खेळण्याचा खेळ खेळतात, रंगाची उधळण करुन शिव-पार्वती लग्नोत्सव सोहळा भाविकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.