Beed : भरल्या ताटावर 50 गरजूंना बसवून काढले फोटो, शिवभोजन थाळीचं अनुदान लाटण्याचा प्रकार

Beed : भरल्या ताटावर 50 गरजूंना बसवून काढले फोटो, शिवभोजन थाळीचं अनुदान लाटण्याचा प्रकार

| Updated on: Jul 03, 2025 | 6:40 PM

Shivbhojan Thali Video : शिवभोजन थाळीचं अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आला आहे.

बीडमध्ये शिवभोजन थाळी केंद्रावर एकच थाली समोर ठेऊन अनेकांचे फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एक थाळी दाखवून शेकडो लोकांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा बनावट प्रकार समोर आला आहे. शेकडो लोकांनी शिवभोजन थाळी केंद्रातील योजनेचा लाभ घेतल्याचं दाखवून लाखो रुपये लाटण्यात आल्याचं आता बीडमधून समोर आलं आहे. बीड शहरातील एका शिवभोजन थाळी केंद्रावरील या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये एक इसम जेवणाच्या टेबलसमोर बसलेला असून त्याच्यासमोर शिवभोजनची थाळी ठेवण्यात आलेली आहे. त्याच थाळी समोरच्या खुर्चीवर लोक येऊन बसत आहेत. त्यांचे फोटो हा इसम काढून घेत आहे. असे अनेक फोटो काढून शिवभोजन थाळीचा लाभ हा शेकडो लोकांनी घेतल्याचा बनाव रचून त्यातून शासनाकडून लाखो रुपये उकळण्याचा हा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या व्हिडीओबाबत चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हंटलं आहे.

Published on: Jul 03, 2025 06:40 PM