भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar ) यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवरुन (BMC Election 2022) शिवसेना (Shiv Sena ) आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. मुंबई महापालिका निवडणूकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची काही खलबत आणि कटकारस्थान सुरू आहेत. भाजप यावर लक्ष ठेवून आहे. आपली हार लक्षात घेता शिवसेना पळवाटा काढायच सुरू आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला. आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघात केला.