Abdul Sattar | मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध हे फक्त नाटक, याचा काही परिणाम नाही : अब्दुल सत्तार

Abdul Sattar | मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध हे फक्त नाटक, याचा काही परिणाम नाही : अब्दुल सत्तार

| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 10:33 AM

शिवसेना नेते आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. “औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक तोंडावर म्हणून एम आय एम प्रसिद्धीसाठी विरोध करत आहे. येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेत इम्तियाज जलीलांना अपेक्षित यश मिळणार नाही म्हणून हा विरोध चाललाय. मुख्यमंत्री आज मराठवाड्यासाठी विशेष घोषणा करतील” असं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहे. मात्र त्यांचा हा दौरा वादळी ठरत आहे. कारण MIM, मनसे, मराठा क्रांती मोर्चा, भाजप या सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. MIM खासदार इम्तियाज जलील यांनी उपरोधात्मक स्वागत फलक लावून आंदोलन केलं. तर मराठा मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनसेने विरोध दर्शवण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

दरम्यान शिवसेना नेते आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. “औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक तोंडावर म्हणून एम आय एम प्रसिद्धीसाठी विरोध करत आहे. येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेत इम्तियाज जलीलांना अपेक्षित यश मिळणार नाही म्हणून हा विरोध चाललाय. मुख्यमंत्री आज मराठवाड्यासाठी विशेष घोषणा करतील” असं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.