Eknath Shinde | महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde | महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 9:22 PM

नागरी सुविधांची कामे युद्धपातळीवर करता येतील. तीन महापालिकांमध्ये बॅनर तयार होईल. लोकांना सोयी देण्यासाठी काम करतोय. निधीचे योग्य प्रकारे वाटप करता येईल. तीन प्रभागात महाविकास आघाडीला सामावून घेता येईल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई : ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. प्रस्ताव हा चार सदस्यीय प्रभागाचा होता. पण मंत्रिमंडळातील काही नेत्यांचं म्हणणं होतं की 3 सदस्यीय प्रभागच योग्य ठरेल. त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 3 सदस्यी प्रभाग निश्चित केला. नगरपरिषद आणि नगरपालिकेत 2, तर नगर पंचायतीमध्ये 1 प्रभाग पद्धत असेल. यामुळे त्या भागातील नागरिकांना नागरी सुविधा देणं सोयीचं ठरेल, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय महाविकास आघाडीने एकमताने घेतला आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चार प्रभाग सदस्यांचा प्रस्ताव होता. काहींचं म्हणणं होतं मोठं होईल. त्यामुळे तीन प्रभागांचा निर्णय अंतिम केला. यामुळे प्रभाग विकास कामांसाठी उपयुक्त होईल. नागरी सुविधांची कामे युद्धपातळीवर करता येतील. तीन महापालिकांमध्ये बॅनर तयार होईल. लोकांना सोयी देण्यासाठी काम करतोय. निधीचे योग्य प्रकारे वाटप करता येईल. तीन प्रभागात महाविकास आघाडीला सामावून घेता येईल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.