Nilesh Rane : लोकांना गृहीत धरू नका.. संशयास वाव… उद्याची मतमोजणी लांबणीवर अन् निलेश राणेंचा निशाणा

Nilesh Rane : लोकांना गृहीत धरू नका.. संशयास वाव… उद्याची मतमोजणी लांबणीवर अन् निलेश राणेंचा निशाणा

| Updated on: Dec 02, 2025 | 2:51 PM

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे. नागपूर खंडपीठाने उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. यावर निलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली. “लोकांना गृहीत धरू नका. कुठेतरी काहीतरी राहिलंय. संशय येण्यासारखा वाव आहे ना. तुम्ही संशय का तयार करता? जनतेच्या कोर्टात आहोत, जनतेने निकाल दिला पाहिजे,” असे निलेश राणे म्हणाले. त्यांनी भाजपच्या उमेदवारांच्या बोगस ओबीसी प्रमाणपत्रांविरोधात वैयक्तिक पातळीवर लढा सुरू केल्याचे सांगितले. या संदर्भात त्यांनी रिट पिटीशन दाखल केली असून, ही लढाई पक्षाला त्रास न देता आपण स्वतः लढत असल्याचे नमूद केले. “माझी लढाई लढायला मी समर्थ आहे,” असे त्यांनी म्हटले. निवडणुकीची प्रक्रिया निष्पक्ष राहावी याकरिता आपण हे सर्व करत असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

Published on: Dec 02, 2025 02:51 PM