Maharashtra Election Results 2026 : मनसेचा धूर संपला आणि मशालीची ज्योत विझली, शिंदेंच्या बड्या नेत्याची टीका अन् ठाकरे बंधूंच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

Maharashtra Election Results 2026 : मनसेचा धूर संपला आणि मशालीची ज्योत विझली, शिंदेंच्या बड्या नेत्याची टीका अन् ठाकरे बंधूंच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

| Updated on: Jan 16, 2026 | 9:51 AM

प्रताप सरनाईकांनी ठाकरे बंधूंनी केवळ मुंबई-ठाण्यावर लक्ष केंद्रित करत इतर महापालिकांकडे दुर्लक्ष केल्याची टीका केली. मनसेचा धूर आणि मशालीची ज्योत विझल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, महायुतीमध्ये जागावाटपावरून चर्चा असून, योग्य मान न मिळाल्यास शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत आहेत. नागपूरमध्ये काँग्रेसच्या बूथवर तोडफोडीची घटना घडली.

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. मनसेचा धूर संपला असून मशालीची ज्योत विझली असे सरनाईक यांनी म्हटले आहे. ठाकरे बंधूंनी केवळ शेवटचे तीन दिवस प्रचार केला आणि त्यांचे लक्ष मुंबई-ठाण्यापुरतेच मर्यादित असल्याचे सरनाईक म्हणाले. महाराष्ट्रात मुंबई-ठाण्याव्यतिरिक्त २७ इतर महापालिका असताना, त्यांनी त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे, शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी रामराजे निंबाळकर, मकरंद पाटील, नितीन पाटील यांची गुप्त बैठक पार पडली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीतून महायुतीमध्ये भाजपने विचारात न घेतल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. योग्य मान आणि जागावाटप न झाल्यास शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यासोबतच, नागपूरमध्ये प्रभाग क्रमांक एकमधील काँग्रेसच्या बूथवर चार अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Published on: Jan 16, 2026 09:51 AM