Sushma Andhare :  …त्यांच्यासाठी सगळं युझ टू, ते खूप रिलॅक्स, एकदाही ना अस्वस्थ… अंधारेंनी पुन्हा उदय सामंतांना डिवचलं

Sushma Andhare : …त्यांच्यासाठी सगळं युझ टू, ते खूप रिलॅक्स, एकदाही ना अस्वस्थ… अंधारेंनी पुन्हा उदय सामंतांना डिवचलं

| Updated on: Nov 26, 2025 | 4:02 PM

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री उदय सामंत यांच्या राजकीय भूमिकेवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सामंत यांना सगळ्या गोष्टी यूज टू आहेत, असे अंधारे म्हणाल्या. ठाकरेंकडून पवार साहेबांकडे, पुन्हा ठाकरेंकडे आणि नंतर सूरत-गुवाहाटीमार्गे शिंदे गटात जाण्याच्या त्यांच्या प्रवासावर त्यांनी टिप्पणी केली.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. उदय सामंत यांना सगळ्या गोष्टी यूझ टू आहेत, असे अंधारे म्हणाल्या. उदय सामंत यांच्या मनात उपमुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र या चर्चांवर बोलताना उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला डाग लागेल असं काहीच करणार नाही असे स्पष्टीकरण दिलं होतं.

यानंतर सामंत यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत अंधारे म्हटले की, सामंत हे ठाकरेंबद्दल बोलले, नंतर पवार साहेबांकडे गेल्यावर त्यांच्याबद्दलही तसेच बोलले आणि पुन्हा ठाकरेंकडे परतल्यावरही ते तसेच म्हणाले. यानंतर सूरत-गुवाहाटीमार्गे शिंदे गटात सामील झाल्यावरही त्यांची वक्तव्ये बदलली. त्यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकांवरून अंधारे यांनी उपरोधिक टीका केली.

एकनाथ शिंदे यांना “सूर्यप्रकाशासारखे सत्य दिसत नसेल तर आपण काय बोलणार,” असेही अंधारे यांनी म्हटले. भाजपची कार्यपद्धती ही पक्ष वाढवण्याची नसून, देवेंद्र फडणवीस हे पक्ष फोडून माणसे चोरतात, असा गंभीर आरोपही अंधारे यांनी यावेळी केला. सामंत यांना कधीही राजकीयदृष्ट्या अस्वस्थ पाहिले नसल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

Published on: Nov 26, 2025 04:02 PM