मुख्यमंत्री रेशीम बागेत गेले आणि लोकांनी त्यांची..., सामनाच्या अग्रलेखातून काय केली नेमकी टीका?
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री रेशीम बागेत गेले आणि लोकांनी त्यांची…, ‘सामना’च्या अग्रलेखातून काय केली नेमकी टीका?

| Updated on: Jan 17, 2023 | 12:22 PM

उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा, बघा काय केली टीका

विरोधकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी विठ्ठलाला साकडं घालावं, महाराष्ट्रातील करणी टोळीचे अघोरी प्रयोग आधीपासूनच सुरु आहे, असे उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावण्यात आला आहे. अपघाच्या मालिकेवरून सामनातून सताधाऱ्यांवर हा निशाणा साधला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपुरातील रेशीमबागेत जाण्यावरूनही सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री हे नागपुरातील रेशमबागेतील संघ मुख्यालयात येऊन गेले. त्यामुळे सरसंघचालकांनी सावधानता बाळगावी. संघ मुख्यालयाच्या कोपऱ्यात सुया, टाचण्या, लिंबू पडले आहेत का? हे तपासा… महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे जे अपघात होत आहेत, त्यामुळे त्या अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे, अशा विषयांवरही सामनातून शिंदे-फडणवीस यांच्यावर पुन्हा ठाकरे गटाकडून निशाणा साधण्यात आला आहे.

Published on: Jan 17, 2023 08:15 AM