Jalgaon : एक चूक अन् उडाला गोंधळ, अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण अन् पुढे जे झालं त्यानं सगळेच हादरले
ज्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती, तेच ६५ वर्षीय आजोबा जिवंत परतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. बघा जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात नेमकं काय घडलं?
जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात मृतदेह ओळखण्यात गोंधळ झाल्याने धक्कादायक आणि विचित्र प्रकार घडला. बेपत्ता झालेल्या आजोबांचा मृतदेह समजून त्यांच्या घरच्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली होती. मात्र तेवढ्यात बेपत्ता असलेले आजोबा घरी परतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रेल्वे रूळावरून मृत व्यक्तीचा मृतदेह ओळखण्यात चूक झाली आणि जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात एकच गोंधळ उडाला.
गेल्या काही दिवसांपासून पाळधी गावातील ६५ वर्षीय रघुनाथ खैरनार ही व्यक्ती बेपत्ता होती. यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांच्या शोधात होते. मात्र त्याचा तपास काही लागत नव्हता अशातच रेल्वे रुळावर एक अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांकडून नातेवाईकांना मिळाली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली आणि एक विचित्र पण हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला.
