Maharashtra : असं काय घडलं की, विद्यार्थीनींच्या अंगावरचे कपडे काढून तपासणी अन्… राज्यातील ‘या’ तीन धक्कादायक घटना, महाराष्ट्र संतापला

Maharashtra : असं काय घडलं की, विद्यार्थीनींच्या अंगावरचे कपडे काढून तपासणी अन्… राज्यातील ‘या’ तीन धक्कादायक घटना, महाराष्ट्र संतापला

| Updated on: Jul 09, 2025 | 4:02 PM

राज्यातील अशा तीन धक्कादायक घटना समोर आल्या की ज्या जाणून घेतल्यानंतर तुमच्या तळ पायाची आग देखील मस्तकात जाईल. बघा कोणत्या आहेत त्या तीन संतापजनक घटना?

राज्यातील तीन संतापजनक घटना समोर आल्या आहेत. शहापूरमधील खासगी शाळेतील स्वच्छता गृहात मासिक पाळीचं रक्त सांडल्यामुळे इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यींनींची शाळेने तपासणी केल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे सर्व मुलींच्या अंगावरचे कपडे काढून शाळेतील शिक्षकांनी तपासणी केली आहे. सर्व मुलींचे फिंगर प्रिंट सुद्धा शाळा प्रशासनाने घेतल्याची माहिती पालकांनी दिली आहे. दुसरीकडे अकोल्यात विमा कंपनीतील मॅनेजरवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झालाय संबंधित महिलेने प्रसंगावधान राखत आरोपीच्या गुप्तांगावर वार करून स्वतःला वाचवलंय.तर तिसरी घटना म्हणजे संभाजीनगरमधील सरकारी नोकर महिलेकडून घरातील कामं आणि मसाज करून घेतल्या आरोप समाज कल्याण उपायुक्तांवर केला जातोय.

Published on: Jul 09, 2025 04:02 PM