Sindhu Water Treaty : सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक

Sindhu Water Treaty : सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक

| Updated on: Apr 25, 2025 | 4:53 PM

India Pakistan diplomatic tension : पाकिस्तन सोबत असलेला सिंधु पाणी करार भारताने स्थगित केला आहे. त्यावर आज केंद्र सरकारची महत्वाची बैठक पार पडणार आहे.

सिंधु पाणी करारावर थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहेत.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलत सिंधु पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. काल भारताने हा करार स्थगित केला असल्याची माहिती औपचारिक पत्र लिहून पाकिस्तानला दिली आहे. त्यानंतर आज या  निर्णयावर आज महत्वाची बैठक पार पडणार आहे.

Published on: Apr 25, 2025 04:53 PM