Chandrapur | घरातील जनरेटर संचाच्या धुराने अख्ख कुटुंब संपलं, 6 जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 13, 2021 | 3:19 PM

जनरेटरच्या धुराने (Generator fumes) गुदमरुन एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर (Chandrapur news) भागात ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. वीज गेल्याने रात्री जनरेटर लावून हे कुटुंब झोपलं होतं.

Follow us on

जनरेटरच्या धुराने (Generator fumes) गुदमरुन एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर (Chandrapur news) भागात ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. वीज गेल्याने रात्री जनरेटर लावून हे कुटुंब झोपलं होतं. मात्र जनरेटरच्या धुरामुळे 7 पैकी 6 जणांवर काळाने घाला घातला. सर्व मृत हे लष्करे कुटुंबातील (Lashkare Family died) आहेत. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे.

नेमकं प्रकरण काय?

चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर भागात लाईट गेली होती. त्यामुळे लष्करे कुटुंबाने घरातील जनरेटर संच लावला होता. रात्री लाईट नसल्यामुळे जनरेटर संच तसाच लावून हे कुटुंब झोपी गेलं. मात्र जनरेटरच्या धुराने घर भरलं. या धुरामुळे झोपेतच सर्वजण गुदमरले आणि 7 पैकी 6 जणांचा मृत्यू झाला.