Solapur Floods : सरपंचाला सलाम, वृद्ध महिलेचा जीव वाचवण्यासाठी… सालापुरातील पुराचा स्तब्ध करणारा Video समोर!
सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर गावात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी तत्परता दाखवत एका वृद्ध महिलेला पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढले आणि जीव वाचला.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर गावात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका जेऊर गावालाही बसला आहे. मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून, नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरांमध्ये पाणी साचल्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकटाच्या वेळी, गावाचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी उल्लेखनीय तत्परता दाखवली.
पूरस्थितीमुळे एका वृद्ध महिलेचे घर पाण्याने वेढले गेले होते आणि त्यांची सुरक्षितता धोक्यात आली होती. सरपंच पाटील यांनी वैयक्तिक पुढाकार घेत त्या वृद्ध महिलेला पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांच्या या त्वरित कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळला. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
