Sadabhau Khot : 8 दिवस कुठं होतात? शेतकऱ्यांचा सदाभाऊंवर रोष, सवाल करताच आमदाराचा काढता पाय
सोलापूर येथे आमदार सदाभाऊ खोत यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. अतिवृष्टी आणि पूरस्थिती दरम्यान आठ दिवस अनुपस्थित राहिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांना प्रश्न विचारले. या संतप्त प्रश्नांना सामोरे न जाता, गोंधळाच्या वातावरणात सदाभाऊ खोत यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला.
आमदार सदाभाऊ खोत यांना सोलापूर दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाला आणि प्रश्नांना सामोरे जावे लागले. आठ दिवस कुठे होतात? असा थेट सवाल करत संतप्त ग्रामस्थांनी खोत यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीने सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या काही भागांना मोठा फटका बसला होता. या कठीण काळात लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप होता. सदाभाऊ खोत जेव्हा एका ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांना जमावाने घेरले. ग्रामस्थांच्या या प्रश्नांमुळे आणि वाढत्या विरोधामुळे सदाभाऊ खोत यांना घटनास्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. बघा नेमकं काय घडलं?
Published on: Sep 27, 2025 02:46 PM
