Sonali Bendre : राज ठाकरेंसोबतच्या व्हायरल व्हिडीओवर सोनाली बेंद्रेने सोडलं मौन, म्हणाली..

Sonali Bendre : राज ठाकरेंसोबतच्या व्हायरल व्हिडीओवर सोनाली बेंद्रेने सोडलं मौन, म्हणाली..

| Updated on: Jun 08, 2025 | 5:41 PM

Sonali Bendre Viral Video With Raj Thackeray : राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांना व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर आता सोनाली बेंद्रे यांनी मौन सोडलं आहे.

मनसेच्या कार्यक्रमात राज ठाकरेंसोबत व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत अभिनेत्री सोनाली बेंद्रेने खुलासा केला आहे. मी माझ्या बहिणीसोबत बोलत होते असं सोनाली बेंद्रेने म्हंटलं आहे. काही दिवसांपूर्वी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यानिमित्ताने दिग्गजांचं कविता वाचन सादर झालं. याच कार्यक्रमाला सोनाली बेंद्रेने देखील हजेरी लावली होती. याचवेळी त्यांचा राज ठाकरेंसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. याचबाबत त्यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य करत खुलासा केला आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सोनालीला त्या व्हायरल व्हिडीओवरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सोनाली म्हणाली, ‘तसं खरंच होतं का?… मला तर शंका वाटते. मी तिथे माझ्या बहिणीशी बोलत होती, जी तिथेच उभी होती. मला असं वाटतं, जेव्हा लोक अशा पद्धतीचं काही बोलतात तेव्हा मला अजिबात आवडत नाही. यात कुटुंबही सहभागी असतात आणि इतर लोकसुद्धा त्यात सहभागी असतात, हे सांगताना सोनालीने आपल्या कुटुंबाचे ठाकरेंच्या कुटुंबासोंबत जून संबंध असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे.

Published on: Jun 08, 2025 05:41 PM