विकासावर एक वाक्य बोला, 2 हजार देतो… फडणवीसांच्या आव्हानावर ठाकरेंचा लाखांचा पलटवार
एका प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य करताना म्हंटल उद्धव ठाकरेंच्या सभेतमध्ये त्यांनी विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं. सामान्य माणसाकरिता केलेलं एक तरी विकासाचं काम सांगावं मी त्यांना 2 हजार द्यायला तयार आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत. सर्व पक्षीय उमेदवार आणि त्यांचे नेते प्रचार आणि सभेत जोर धरून आहेत. एका प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य करताना म्हंटल उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये त्यांनी विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं. सामान्य माणसाकरिता केलेलं एक तरी विकासाचं काम सांगावं मी त्यांना 2 हजार द्यायला तयार आहे. आधी हजारच देत होतो पण मागच्या सभेत रिस्पॉन्स आला नाही, म्हणून मागच्या सभेत 2 हजार केलेत तुम्ही म्हणत असाल तर 3 हजार द्यायला तयार आहे. ठाकरेंनी विकासावर एक तरी भाषण करून दाखवावं असं भाष्य करत फडणवीसांनी ठाकरेंना चांगलंच डिवचलं आहे.
यावर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे म्हणाले माझा मुंबईकरांवर आणि मुंबईकरांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून हे मुंबई मॉडेल अभिमानाने दाखवू शकतो. असं फडणवीसांनी त्यांच्या पंतप्रधानांसह त्यांच्या शासित राज्यात कोणी नेमकं काय केलयं हे दाखवावं, मी त्यांना आणखी एक लाख रुपये देतो असं वक्तव्य करत फडणवीसांवर पलटवार केला आहे.
