VIDEO : Rajesh Tope | विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबणार : राजेश टोपे

VIDEO : Rajesh Tope | विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबणार : राजेश टोपे

| Edited By: | Updated on: Oct 20, 2021 | 1:58 PM

राज्यातील अनेक महाविद्यालये आजपासून सुरु झाली आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या मुद्द्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे हे महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ‘मी काल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी महाविद्यालये सुरु करण्याबाबत बोललो. त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं स्वागतच आहे.

राज्यातील अनेक महाविद्यालये आजपासून सुरु झाली आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या मुद्द्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे हे महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ‘मी काल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी महाविद्यालये सुरु करण्याबाबत बोललो. त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं स्वागतच आहे. मात्र, आता यापुढे 18 वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांचं लसीकरण आपल्याला करावं लागेल. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. तसंच पोस्ट व्हॅक्सिनेशन बाबतही काळजी घ्यायची आहे. या दृष्टीकोनातून जे किट आहेत ते आपल्याला उपलब्ध करुन द्यावे लागणार असल्याचं टोपे म्हणाले.